आम्ही २८८ जागा लढवणार : प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

'आम्ही २८८ जागा लढवणार'',असा विश्वास वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ''आगामी विधानसभेत विरोधी पक्ष आणि पक्ष नेता वंचितचा असेल'' असे भाकीत वर्तविले होते. त्यावर बोलताना ते म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांनी भीतीपोटी सांगितलं की, वंचित विरोधीपक्ष असेल, पण आम्ही सत्तेत येणार आहोत.''

पुणे : ''आम्ही २८८ जागा लढवणार'',असा विश्वास वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ''आगामी विधानसभेत विरोधी पक्ष आणि पक्ष नेता वंचितचा असेल'' असे भाकीत वर्तविले होते. त्यावर बोलताना ते म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांनी भीतीपोटी सांगितलं की, वंचित विरोधीपक्ष असेल, पण आम्ही सत्तेत येणार आहोत.''

'आम्ही सत्तेवर आलो की, कोणालाही पाण्यावाचून वंचित ठेवणार नाही'', असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीचे समन्यायी पाणी वाटप धोरण जाहीर केले. याबाबत बोलताना ते म्हणाले, ''टाटा तसेच कोयना या धरणांचे कोकणात जाणारे पाणी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रला देता येऊ शकते. सत्तेत आलो तर आम्ही हे नक्की करू.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar said vanchit bahujan Aghadi Will Fight 288 Place in Maharashtra Vidhan Sabha 2019