esakal | औषधांच्या किमतीबाबत प्रकाश जावडेकर म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

औषधांच्या किमतीबाबत प्रकाश जावडेकर म्हणाले...

- सॅनिटरी नॅपकिन दहा रुपयांवरून एक रुपयांवर 

औषधांच्या किमतीबाबत प्रकाश जावडेकर म्हणाले...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : देशात सहा हजार जनऔषधी केंद्रे असून, दररोज दोन लाखांहून अधिक नागरिकांना याचा लाभ होतो. जनऔषधी केंद्रांमुळे औषधांच्या किंमती खाली आल्या आहेत. ज्या औषधांची किंमत 87 रुपये होती ती आता 24 रुपयांना उपलब्ध आहे. सॅनिटरी नॅपकिनची किंमत दहा रुपयांवरून एक रुपयावर आल्याची माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनऔषधी दिनानिमित्त येथील नागरिकांशी संवाद साधला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात जावडेकर बोलत होते. ते म्हणाले, स्टेंटसारख्या महागड्या मेडिकल इम्प्लांट्‌सची किंमत पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे. त्याची किंमत सध्या एक लाख 64 हजारांऐवजी केवळ 37 हजार रुपये इतकी आहे. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेचा 50 कोटी लोकांना फायदा होईल.

आतापर्यंत 95 लाख लोकांनी या योजनेंतर्गत उपचार घेतले आहेत. योगाच्या माध्यमातून भारतीय जीवनशैलीला चालना देऊन आणि फिट इंडियासारख्या योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकार नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याकडे सर्वांगीण लक्ष देत आहे. 

प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी

स्वातंत्र्यानंतर अंधारात असलेल्या 18 हजार खेड्यांना सहा वर्षांत विक्रमी वेळेत वीजपुरवठा करण्यात आला. तसेच, 12 कोटी स्वच्छतागृहे बांधण्यात आली. मिशन इंद्रधनुष लोकांच्या लसीकरणाची काळजी घेत आहे. सरकारने 35 ते 40 कोटी बॅंक खातीही उघडली आहेत. त्यामुळे योजनांचे पैसे थेट गळतीशिवाय लाभार्थ्यांच्या खात्यात जात आहेत. "हर घर नल से स्वच्छ जल' हा आमचा पुढील महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

loading image