पंढरपूर तालुक्यात खासदार प्रणिती शिंदे यांचा ग्रावभेट दौरा

पंढरपूर तालुक्यात खासदार प्रणिती शिंदे यांचा ग्रावभेट दौरा

Published on

PTK26B01035
पोहोरगाव (ता. पंढरपूर) ः येथे गावभेटीदरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे. यावेळी संदीप पाटील व इतर.

खासदार प्रणिती शिंदे यांनी साधला नागरिकांशी संवाद
पंढरपूर तालुक्यात गावभेट दौरा; मूलभूत प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही

पटवर्धन कुरोली, ता. ४ ः सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ विधानसभा अंतर्गत पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी आणि पोहोरगाव या गावांना भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. या गावभेटीदरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत पाणी, रस्ते, आरोग्य, वीज यांसारख्या मूलभूत विषयांवर सविस्तर चर्चा केली. ग्रामस्थांचे प्रश्न ऐकून घेत त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या.

मगरवाडी गावातील अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले. आळंदी-मोहोळ या राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल होण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. पोहोरगाव गावाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी आणि व्यायामशाळेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच दोन्ही गावातील ग्रामस्थांनी विजेच्या ट्रान्सफॉर्मर बद्दल तक्रारी सांगितले असता खासदार प्रणिती शिंदे यांनी ताबडतोब महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ताबडतोड नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे आदेश दिले.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची, शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न कणखरपणे मांडण्याची नितांत गरज आहे. ही भूमिका आम्ही आजपर्यंत सक्षमपणे बजावली असून, पुढेही सातत्याने बजावत राहू असे सांगितले.
यावेळी काँग्रेसचे पंढरपूर तालुकाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा समन्वयक मनोज दादा यलगुलवार, तालुका उपाध्यक्ष सादिक मुलाणी यांच्यासह नेताजी सावंत, सुरेश सावंत मगरवाडी, छाया शेजाळ, पांडुरंग माने, सचिन पवार, महावीर सावंत, भारत वाघमारे, रघुनाथ गायकवाड, गणेश घुले, वासू डोंगरे, अप्पासाहेब गायकवाड, फारूक मुलांनी, प्रदीप गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com