
पुण्यातील बहुचर्चित ड्रग्स पार्टी प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. खेवलकर यांच्या वकिलांनी असा दावा केला आहे की, पोलिसांनीच या प्रकरणात खेवलकर यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी बनावट कारवाई केल्याचा आरोपही वकिलांनी केला आहे.