पुणे - अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात नुकत्याच झालेल्या १० दिवसांच्या मॅरेथॉनमध्ये ४८ वर्षांचे पुणेकर प्रशांत पेठे यांनी तब्बल ९६८ किलोमीटर अंतर धावून पूर्ण केले. या मॅरेथॉनमध्ये एवढे अंतर पार करणारे पेठे हे पहिले भारतीय ठरले आहे. विविध देशांतील १६ स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.