

पुणे - कात्रज परिसरातून तब्बल पाच कोटी ७९ लाखांचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी अटक केलेल्या प्रशांत सुरेश सावंत याने हा अमली पदार्थांचा साठा दिल्ली येथून आणला होता. बेनी नावाच्या एका नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून तो हा साठा बंगळुरू येथे देण्यासाठी निघालेला असताना त्याला कात्रज येथे पकडण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.