प्रतापसिंह उद्यानास पाच कोटी- पंकज चव्हाण

प्रतापसिंह उद्यानास पाच कोटी- पंकज चव्हाण
Published on

प्रतापसिंह उद्यानास पाच कोटी-ः पंकज चव्हाण

सातारा, ता. २७-ः सातारा शहरातील ऐतिहासिक श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उद्यान विकसित करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतून तब्बल पाच कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनीही पत्रकाद्वारे नगरसेवक पंकज चव्हाण यांनी प्रतापसिंह महाराज उद्यान विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माझ्याकडे केली होती. त्यानुसार पाठपुराव्यास यश आल्याचे म्हटले आहे. शासनाने पाच कोटींचा निधी मंजूर केल्याने दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत. हा निधी उपलब्ध झाल्याने ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाचे रुपडे पालटणार असून, याठिकाणी नागरिकांसाठी विविध प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण करून या परिसराचा कायापालट केला जाणार आहे, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, उपलब्ध निधीनुसार प्रतापसिंह महाराज उद्यानाचा विकसित डीपीआर तातडीने तयार करावा, अशी सूचना मंत्री भोसले यांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांना दिल्या आहेत. अनुभवी व तज्ज्ञ आर्किटेक्ट नियुक्त करून विकास आराखडा तयार करावा. उद्यान परिसराचा विकास करताना नागरिकांसाठी कोणत्या आवश्यक सोयीसुविधा निर्माण करता येतील, ऐतिहासिक वारसा जपत नागरिकांसाठी सुंदर हरित परिसर, वॉकिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळणी यासह आकर्षक बागबगीचा विकसित करणे आणि संपूर्ण परिसराचा कायापालट करणे, यादृष्टीने आराखडा तयार करून तातडीने पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना पालिका प्रशासनास केल्याचे मंत्री भोसले व खासदार भोसले यांनी पत्रकात नमूद केले आहे.
-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com