

प्रतीक पाचपुतेला एलसीबीकडून अटक
श्रीगोंदे, ता. १७ : खंडणीसह जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रतीक गोकूळ पाचपुते (वय २५, रा. काष्टी, ता. श्रीगोंदे) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंगवे तुकाई (ता. नेवासे) येथून अटक केली. याप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर रोजी फिर्यादी विजय भास्करराव शेळके (वय ४१, रा. गुणवडी, ता. अहिल्यानगर) हे श्रीगोंदे येथून घरी जात असताना टाकळी लोणार ते पिंपळगाव खांड जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी प्रतीक पाचपुते व इतरांनी फिर्यादी व साक्षीदारांना अडविले. त्यांना काठीने व लोखंडी टॉमीने मारहाण करून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादीने रक्कम देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांच्याकडील रोख रक्कम जबरीने काढून घेतली.
या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेवदाड व पोलिस अंमलदार अतुल लोटके, राहुल धारके, नीळकंठ कारखिले, शाहीद शेख, बाळासाहेब नागरगोजे, आजिनाथ पाखरे, अमोल कोतकर, प्रताप देवकाते, सागर रसाळे व मनोज साखरे यांची दोन पथके तयार करण्यात आली.
या पथकांनी आरोपीचा सातारा, सांगली, पुणे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत शोध घेतला. मात्र, आरोपी वारंवार वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. अखेर मिळालेल्या माहितीनुसार शिंगवे तुकाई येथून आरोपीला ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.