

SHR26B12195
कोल्हार (ता.राहाता) ः प्रवरा सांस्कृतिक महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांसमवेत शालिनी विखे पाटील, प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर व प्राचार्य सुधीर मोरे.
प्रवरा महोत्सवातून कलागुणांची निर्मिती
शालिनी विखे : कोल्हारला कलाविष्काराचे अनोखे सादरीकरण
कोल्हार, ता.२० : प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अंगभूत व आत्मविश्वासपूर्ण कलागुणांची निर्मिती होत आहे. एकेकाळी केवळ शहरी भागापुरतीच मर्यादित योग्य व मुक्त व्यासपीठ प्रवरामुळे आता ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणासोबत कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करतील, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी व्यक्त केला.
लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आयोजित व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून, तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील व संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवा’च्या कोल्हार येथील सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमात १५ शाळांमधील ४१० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, संभाजी देवकर, प्रवरा बँकेचे संचालक सुधीर आहेर, सारिका आहेर, मधुकर दा.खर्डे, सरपंच दत्तात्रेय राजभोज, प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर, प्राचार्य डॉ. सुधीर मोरे, गोरक्ष खर्डे आदी उपस्थित होते. डॉ. भाऊसाहेब नवले व डॉ. अंकुश सूर्यवंशी स्पर्धेचे परीक्षक होते.
------------
स्पर्धेतील विजेते
नंदनवन पब्लिक स्कूल (फत्याबाद), प्रवरा माध्यमिक विद्यालय (गुहा), प्रवरा विद्या मंदिर (फत्याबाद) आणि प्रवरा हायस्कूल (कोल्हार) यांनी घवघवीत यश मिळवत विजेतेपद पटकावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.