
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या हल्ल्यामागे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप गायकवाड यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला. हल्ल्याच्या कटाची रेकी चार दिवसांपासून सुरू होती आणि हल्लेखोर स्वागतासाठी आलेल्या लोकांमध्ये लपले होते, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात दीपक काटे नावाच्या व्यक्तीवरही गंभीर आरोप करण्यात आले असून, त्याच्याकडे शस्त्र आणि 28 काडतुसे सापडल्याची माहिती समोर आली आहे.