
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या शाईफेक हल्ल्याने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी भाजप आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले. हा हल्ला सरकार प्रायोजित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.