Marathi Literature Festival: १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी राज्यभर ९९ ठिकाणी ‘साहित्य जागर’

१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीत राज्यभर ९९ ठिकाणी फिरते पुस्तक प्रदर्शन, परिसंवाद, अभिवाचन, मुलाखती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा ‘साहित्य जागर’ उपक्रम
"साहित्याची वारी, वाचकांच्या दारी!" मसाप आणि पुणे पुस्तक महोत्सवाचा राज्यव्यापी 'साहित्य जागर' उपक्रम; ९९ केंद्रांवर होणार कार्यक्रमांची उधळण.

"साहित्याची वारी, वाचकांच्या दारी!" मसाप आणि पुणे पुस्तक महोत्सवाचा राज्यव्यापी 'साहित्य जागर' उपक्रम; ९९ केंद्रांवर होणार कार्यक्रमांची उधळण.

Sakal

Updated on

पुणे : आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) आणि पुणे पुस्तक महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर ९९ ठिकाणी फिरते पुस्तक प्रदर्शन आणि एकदिवसीय संमलने आयोजित केली जाणार आहेत. संमेलनपूर्व कार्यक्रमांची ही नांदी ठरणार असून यानिमित्ताने राज्यभर ‘साहित्य जागर’ होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com