बारामतीत कचरावेचक घंटागाडीच्या माध्यमातून केलं जातंय असं काही...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृतीचे विविध प्रयत्न केले जात आहेत. विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून लोकांना माहिती देण्याचे प्रयत्न होत आहेत.

बारामती : कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृतीचे विविध प्रयत्न केले जात आहेत. विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून लोकांना माहिती देण्याचे प्रयत्न होत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामतीत नगरपालिकेने अभिनव पध्दतीने या जनजागृतीचा प्रयत्न केला आहे. कोरोनाबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यासाठी कचरा वेचक घंटागाड्यांवरील स्पीकरचा खुबीने वापर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. कचरा गाडी आल्याची वर्दी देण्याच्या मधल्या कालावधीत कोरोनाच्या जनजागृतीची मराठीतील क्लिप नागरिकांना ऐकविली जाते. हा अतिशय प्रभावी उपाय असून, त्याचा चांगला फायदा होत असून नागरिकही आवर्जून ही माहिती लक्षपूर्वक ऐकत असल्याचे दिसले आहे.

कोणताही अतिरिक्त खर्च न करता घंटागाडीचा जनप्रबोधनासाठी बारामती नगरपालिकेकडून झालेला हा प्रयोग अभिनव म्हणावा लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Precautionary Announcement with Vehicle in Baramati