

पक्षी, झाडे अन् आकाशातील बदलांतून हवामानाचा अंदाज शक्य
हवामान अभ्यासक पंजाब डख यांचे वाशिंबेत मार्गदर्शन; पुढील आठवड्यात पावसाचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
केत्तूर, ता. २० : पक्ष्यांच्या हालचाली, झाडांमधील बदल, वाऱ्याची दिशा आणि आकाशातील ढगांची रचना यांचे निरीक्षण करून हवामानातील बदलांचा अंदाज घेता येतो, असे हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितले.
वाशिंबे (ता. करमाळा) येथील नवयुग कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित हवामान मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. त्यांनी हवामानाचा अंदाज, पावसाचे संकेत, निसर्गातील बदल आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास मकाईचे संचालक गणेश झोळ, करमाळा पंचायत समितीचे उपसभापती अजित विघ्ने, संचालक अजित झंझुर्ने, माजी सरपंच भगवान डोंबाळे, कल्याण शिंदे, प्रा. जाकीर शेख, राजाभाऊ जगदाळे, शैलेश झोळ यांच्यासह नवयुग मंडळाचे पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
-----------------------
अल निनोविषयी मार्गदर्शन
दक्षिण अमेरिका खंडातील पेरू देशाच्या परिसरातील प्रशांत महासागराच्या पाण्याच्या तापमानातील वाढीशी अल निनोचा संबंध आहे. भारत व अमेरिका पृथ्वीच्या विभिन्न बाजूस असल्यामुळे त्याचा भारतावर थेट परिणाम होत नाही, असे डख यांनी सांगितले. उपस्थित शेतकरी व नागरिकांनी हवामानाचा अंदाज, पावसाचे संकेत आणि शेती नियोजनाबाबत प्रश्न विचारले. पुढील आठ दिवसांत करमाळा तालुक्यात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.