
पिंपरी : वाकड येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेवेळी होणाऱ्या विद्यार्थिनींच्या नियमित आरोग्य तपासणीत गर्भधारणा चाचणीही (युपीटी टेस्ट) करण्यात येत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी राज्य महिला आयोगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना मंगळवारी नोटीस बजावली.