युट्युबवर व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलीने स्वतः केली स्वतःची प्रसुती

कोंढवेधावडे येथील बेवारस स्थितीत आढळलेल्या चिमुकलीच्या जन्मा मागची धक्कादायक कहाणी; दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी
Pregnant minor girl gave birth herself after watching video on YouTube pune
Pregnant minor girl gave birth herself after watching video on YouTube pune

किरकटवाडी: उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंढवेधावडे येथे बेवारस स्थितीत आढळलेल्या चिमुकलीच्या जन्माबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. युट्युबवर व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलीने स्वतःच स्वतःची प्रसुती करुन बाळाला फेकून दिल्याची कबुली दिली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली असून संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चार ते पाच महिन्यांपूर्वी संबंधित अल्पवयीन मुलगी व तिची आई घराजवळ असलेल्या एका खाजगी दवाखान्यात गेली होती. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असण्याची शक्यता असून आपण तातडीने याबाबत सोनोग्राफी करुन खातरजमा करण्याची गरज असल्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी आई व मुलीने डॉक्टरांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले व गर्भपीशविला सुज आल्याने मुलीच्या पोटात दुखत आहे असे शेजाऱ्यांना व घराच्या मालकीनीला सांगितले.

त्यावेळीच आम्हाला सदर मुलगी गर्भवती असावी तिची आई आपल्यापासून काहीतरी लपवत असावी असा संशय आला होता असे घर मालकीनीने सांगितले. काल रात्री नवजात बाळ सोसायटीच्या आवारात आढळून आल्याने सर्वांना धक्का बसला. पोलीस आले व बाळाला उपचारांसाठी घेऊन गेले. त्यानंतर चर्चा सुरू असताना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक रुग्णवाहिका सोसायटीच्या खाली दिसली होती व सोसायटीतल्या एका मुलीला बेशुद्ध अवस्थेत त्यात नेण्यात आल्याचे काहींनी सांगितले. घर मालकीनीच्या मागील चार महिन्यांपूर्वीचा घटनाक्रम लक्षात आला व ते नवजात बाळ याच मुलीचे असावे अशी त्यांची खात्री पटली. त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांना ही माहिती कळवली.

एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या संबंधित अल्पवयीन मुलीने ते बाळ आपणच तेथे फेकले असून युट्यूबवर व्हिडिओ पाहून स्वतःच स्वतःची प्रसुती केल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. याबाबत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे उत्तमनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी सांगितले आहे."ही अत्यंत धक्कादायक घटना असून राज्य महिला आयोगाने या प्रकरणी स्वाधिकाराने दखल घेतली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत. सध्या बाळ व कुमारी माता उपचार घेत असून राज्य महिला आयोग यावर जातीने लक्ष देत आहे."

- रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com