

Pune
esakal
पुणे: पुण्याहून धावणाऱ्या १२ रेल्वेला प्रीमियम तत्काळ कोटा लागू आहे. ऐनवेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे कन्फर्म तिकीटाची हमी मिळते. मात्र यासाठी लागू असलेल्या डायनॅमिक प्राईसिंगमुळे (मागणीनुसार वाढणारे दर) प्रवाशांना ही तिकिटे चांगलीच महागात पडत आहेत. तत्काळ कोट्याच्या ३० टक्क्यांहून अधिकचे दर लागू होतात, शिवाय ज्या प्रमाणात सीट कमी होतात, त्याप्रमाणे तिकिटाचे दर वाढत जातात.