

घोरपडी, ता. १२ ः पूर्वप्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून स्वच्छतागृहात बंद करून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी घोरपडी येथील एका शाळेतील शिक्षिकेसह व्यवस्थापिकेविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बी. टी. कवडे रस्ता येथील एका पूर्वप्राथमिक शाळेत आठ ऑक्टोबर रोजी घडली. विद्यार्थ्याला शाळेतील स्वच्छतागृहात बंद करून ठेवल्याचा आरोप त्याच्या पालकांनी पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे.
याप्रकरणी शाळेतील शिक्षिका आणि व्यवस्थापिका यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम, २०१५ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी करून मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास मुंढवा पोलिस करीत आहेत.
घोरपडीतील संबंधित शाळेसंदर्भात आमच्याकडे तक्रार आल्यावर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. त्या शिक्षिकेसह शाळेला नोटीस पाठवली आहे. कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
- स्मिता वासनिक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.