मराठी : संतसाहित्यातून समृद्ध झालेली अस्मितेची भाषा
VRG26B06251
फोटो : गांधी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बोलताना प्र. प्राचार्य डॉ. शकील शेख, प्रा. बाबर बी. बी. प्रा संपतराव जाधवर व प्रा. मकरंद भुजबळ.
मराठीचा समृद्ध वारसा जपला पाहिजे : शकील शेख
सकाळ वृत्तसेवा
वैराग, ता. ६ : मराठी ही संत साहित्याने समृध्द झालेली भाषा असून आपल्या संस्कृतीची आणि अस्मितेची ओळख असल्याने मराठीचा समृद्ध वारसा आपण जपला पाहिजे, आजच्या जागतिकिकरणाच्या काळात अनेक भाषा लोप पावत असल्याने मराठी भाषा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्र. प्राचार्य डॉ. शकील शेख यांनी केले.
येथील सुवर्णलता गांधी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर प्रा. बी. बी. बाबर, प्रा. डॉ. डी. के. शिंदे, प्रा. डॉ. विशाल कदम, प्रा. मकरंद भुजबळ, अनिल घोडके आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. बाबर म्हणाले की, मराठी भाषेमुळे आपली संस्कृती टिकून आहे. या भाषेतून अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. मराठी भाषेला प्राचीन परंपरा लाभली आहे. तिचा सर्वांनी आदर केला पाहिजे असे सांगितले. याप्रसंगी शिवानी पावले, ज्ञानेश्वरी गुरव, मानसी अडाने व सौरव गांडुळे आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संपतराव जाधवर यांनी केले. आभार राजलक्ष्मी मोरे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

