

पुणे : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पुणे दौरा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना गणेशखिंड रस्त्याला प्रचंड खड्डे पडल्याने हा रस्ता दुरुस्त करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. या ठिकाणी मेट्रो आणि उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हा रस्ता दुरुस्त करावा, असे पत्र पुणे महापालिकेने दिले होते.