
दौंड - पुणे जिल्ह्यातील नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा पोलिस अधीक्षक रामचंद्र केंडे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. शिपाई पदापासून पोलिस सेवेस सुरवात करीत परिश्रमाने ते पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.