

waste management project
पुणे - उरूळी देवाची येथे २०० टन सुक्या कचऱ्याचा आणि ३०० टन ओल्या कचऱ्याचा असे दोन प्रकल्पाची संयुक्त निविदा काढून एकाच ठेकेदाराला ५०० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प देण्याचा घाट घालण्यात आला आहे. पण हा प्रकल्प ठरावीक ठेकेदाराच्या फायद्यासाठी आहे, त्यातून पुणेकरांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे संयुक्त निविदा न काढता स्वतंत्र निविदा काढली जावी अशी मागणी विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.