रेमडेसिव्हिरची किंमत निश्‍चित

रेमडेसिव्हिरची किंमत निश्‍चित

पुणे -  सिप्ला कंपनीने उत्पादित केलेल्या 100 मिलिग्रॅम रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा दर 2 हजार 282.88 रुपये निश्‍चित करण्यात आला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. 

राज्यातील काही कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचारांसाठी डॉक्‍टर रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनला प्राधान्य देतात. याबाबत वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे दर आहेत. त्यात हेट्रो आणि डॉक्‍टर रेड्डीच्या या कंपनीच्या एका इंजेक्‍शन वायलची किंमत 5 हजार 400 रुपये आहे. ज्युबिआर 4 हजार 900 आणि सिप्ला 4 हजार रुपये किंमत आहे. यापैकी सिप्ला कंपनीच्या रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचे सुधारित दर निश्‍चित करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना उपचारांसाठी अत्यावश्‍यक औषधांचे दर निश्‍चित करण्याचे आदेश सरकारने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला दिले होते. त्या आधारावर सिप्ला कंपनीतून उत्पादित होणाऱ्या रेमडेसिव्हिरचे दर निश्‍चित केले असल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबाधीत रुग्णांवर राज्यातील सर्व शासकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाची रुग्णालये व कोरोनाच्या उपचारांसाठी घोषित केलेली सर्व खासगी रुग्णालयांमध्येही हे रुग्ण दाखल आहेत. रुग्णांसाठी अत्यावश्‍यक औषधाच्या किंमती नियंत्रित करण्यात आल्या आहेत. 
डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com