esakal | पेट्रोल-डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...
sakal

बोलून बातमी शोधा

पेट्रोल-डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या वाहनचालकांना इंधन दरवाढीची झळ सोसावी लागत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरावरून पुणेकरांना असाही दिलासा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : इंधन दरवाढीमुळे बजेट बिघडलेल्या वाहनचालकांना गेल्या सहा दिवसांपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्याभर सतत सुरू असलेली इंधन दरवाढ सध्या थांबली आहे. 29 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. शनिवारी शहरात पेट्रोल 86.89 आणि डिझेल 77.35 रुपये प्रति लिटर आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या वाहनचालकांना इंधन दरवाढीची झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे वाहनचालक अक्षरशः वैतागले होते आहेत. दरवाढ अशीच सुरू राहिली तर पेट्रोलची किंमत 100 रुपये होती की काय? अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, गेल्या सहा दिवसात दर स्थिर राहिल्याने वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येत्या काळात इंधनाचे दर कमी व्हावेत, अशी अपेक्षा वाहनचालक व्यक्त करत आहे. मात्र, दुचाकीसह नियमित चारचाकी वाहनाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला बसणारी चाट गेल्या महिन्याभरात 18.35 रुपयांनी वाढली आहे. एक जूनपासून डिझेलच्या किमतीत 10.36 रुपयांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोल 7.99 रुपयांनी महागले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंधन दरवाढीविरोधात राज्यभरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. इंधनाच्या किमती स्थिर झाल्याबाबत ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला म्हणाले, "या आठवड्यात दर स्थिर होतील अशी अपेक्षा होतीच. त्यानुसार आता दर थांबले आहे. यापुढे किंमत वाढेल असे वाटत नाही. दर स्थिर झाल्याने सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

सीएनजी एक रुपयाने महागला

इंधनाचा माफक पर्याय म्हणून शहरांमध्ये सीएनजीला चांगली पसंती मिळत आहे. गेल्या महिन्यात सीएनजीचे दर स्थिर होते. मात्र, एक जुलै रोजी त्याच्या किमतीत एक रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या शहरात सीएनजी 54.80 रुपये प्रति किलो आहे.

शहरातील इंधनाचे दर : 

पेट्रोल       86.89
डिझेल       77.35
सीएनजी   54.80

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image