Apurva Chavan
sakal
गुनाट - चव्हाणवाडी (ता. शिरूर) येथील अपूर्वा ज्ञानदेव चव्हाण हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात ६६ वे स्थान प्राप्त करीत कृषी अधिकारी पदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे अपूर्वा सध्या पनवेल येथे दुय्यम निबंधक कार्यालयात सहाय्यक सहकारी या पदावर काम करत आहेत. नोकरी आणि अभ्यास यांचा मेळ घालत तिने मिळवलेले हे यश तालुक्यातील मुलींसाठी दिशादर्शक ठरले आहे.