

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२५ अखेर विक्रमी ६१ हजार ९५६ कोटींचा व्यवसाय पूर्ण केला आहे. याचबरोबर, बँकेने ६५१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवून सलग चौथ्या वर्षी नफ्यात सातत्य राखले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे बँकेचे नक्तमूल्य (नेटवर्थ) पाच हजार कोटींवर पोहोचली असून, ही कामगिरी गाठणारी देशातील एकमेव सहकारी बँक ठरली आहे.