ritesh dhawade
sakal
शिरूर - यंदाच्या प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या ७७ व्या संचलनासाठी, येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील ३६ महाराष्ट्र बटालियन युनिटचा राष्ट्रीय छात्र सेनेचा ज्युनिअर अंडर ऑफिसर रितेश धावडे यांची निवड झाली आहे.
२६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी राजपथावरील संचलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सहाशे विद्यार्थ्यांमधून १२० विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यात रितेशचा सहभाग आहे. या संचलनासाठी छात्रांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर कठोर प्रशिक्षण व चाचण्या द्याव्या लागतात. शिस्त, शारीरीक क्षमता तसेच देशभक्तीची भावना या निकषांवर विद्यार्थ्यांची या संचलनासाठी निवड केली जाते.