
पुणे - केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडुन दुसऱ्या टप्प्यात तब्बल चार हजारांहुन अधिक सदनिका बांधण्याचे उद्दीष्ट महापालिका प्रशासनाने ठेवले आहे. शहरातील बालेवाडीसह मुंढवा, धानोरी व वडगाव अशा वेगवेगळ्या भागात या सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांना त्याचा अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.