esakal | पंतप्रधान मोदींच्या मते मराठा आरक्षण राज्याचा विषय - चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi Maratha Reservation

मोदींच्या मते मराठा आरक्षण राज्याचा विषय - चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

पुणे ''मराठा आरक्षण हा माझा विषय नाही, राज्याचा आहे'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे मत असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पुण्यात एका कार्यक्रमा दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.(Prime Minister Modi says the issue of Maratha reservation belongs to the states informed Chandrakant Patil)

''मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या रस्त्यावरचे आंदोलन सामुहिक आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरेल'' असा इशारा दिला छञपती खासदार संभाजी राजे भोसले यांनी दिला. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप भेटीसाठी वेळ न दिल्याने संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान याबाबत विचारले असता, ''मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी राजेंनी त्यांचं मत मांडलं, मेटेंनी त्यांचं मत मांडलं. 'हा विषय माझा नाही, राज्याचा आहे', असं पंतप्रधान मोदींचे म्हणणं आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांची भेट झाली नाही.'' असा खुलासा पाटील यांनी केला.

हेही वाचा: झोपेतून जागं झालं आणि आपलं सरकार गेलं

'कोरोनासंदर्भातील सर्व नियम पाळून मराठा आरक्षणप्रश्नी येथे पाच जूनला मोर्चा काढणारच असल्याची घोषणा आमदार विनायक मेटे यांनी रविवारी (ता. २३) येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान याबाबत विचारले असता, ''जे काही सकारात्मक आणि रचनात्मक आहे त्यात आम्ही पूर्ण ताकदीसह सहभागी होऊ'' असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी मेटेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

हेही वाचा: दहावी परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता नसल्याने पालक-विद्यार्थी गोंधळात

loading image