Pune : पिंपळगाव तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : पिंपळगाव तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक

मंचर :पिंपळगाव तर्फे महाळुंगे (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे/शिंदे यांनी विद्यार्थ्यांकडून “टाकाऊ पासून टिकाऊ” या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या बीज राख्या व लिहिलेली पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय सैनिकांना पाठवल्या होत्या. पत्र व राख्यांची दाखल घेऊन पंतप्रधानांनी आभाराचे पत्र शाळेला पाठवली आहेत. पत्र पाहून शिक्षक, विद्याथी व पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

गांजाळे यांनी इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भोपळा, मिरच्या, गवार व भेंडीच्या बियांपासून राख्या बनविल्या. राख्या व पत्रलेखन उपक्रमांतर्गत “बीज राखीच्या बिया एका भांड्यात लावा, त्याची रोप तयार करून निसर्गात लावा” असा संदेश विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पत्रांतून दिला होता. राख्यांचा व पत्रांचा पंतप्रधानांनी स्वीकार केला. शाळेच्या पत्त्यावर गांजाळे यांच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी आभाराचे पत्र पाठवून उत्तरही दिले आहे. त्यामुळे शाळेत आनंदाचे वातावरण आहे.

चौकट

“मृणाल गांजाळे यांनी पुढाकार घेऊन राबविलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थांना अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. त्यात पत्रलेखन, बीज राखी, टाकाऊ पासून टिकाऊ, पर्यावरण संतुलन आदी बाबींचे विद्यार्थांना ज्ञान मिळाले आहे. या उपक्रमाची दखल थेट पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी घेतली आहे. ही आमच्या शाळेसाठी गौरवाची बाब आहे.”

कांतीलाल दंडवते, मुख्याध्यापक जि.प.प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे महाळुंगे (ता.आंबेगाव)पिंपळगाव तर्फे महाळुंगे (ता आंबेगाव) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्राप्त झालेले पत्र दाखविताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षिका मृणाल गांजाळे/ शिंदे .

Web Title: Prime Minister Pimpalgaon Zilla Parishad Primary School Praise Teacher Student Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..