

फोटो ः प्रिन्स कलाटे
प्रत्यूष उघाडे
---------------
प्रिन्स, प्रत्यूष, अर्णवची चमकदार कामगिरी
पुणे, ता. २१ ः सेव्हन स्पोर्ट्स आयोजित तेरा वर्षांखालील गटाच्या अँजेल करंडक क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक क्रिकेट अकादमीने वेदिक अकादमीचा ३०६ धावांनी पराभव केला त्यात प्रमुख वाटा प्रिन्स कलाटे व प्रत्यूष उघाडेची शतकी खेळी आणी अर्णव भेंडभारने केलेल्या अचूक गोलंदाजीचा होता.
मुळशी क्रिकेट मैदानावर झालेल्या या लढतीत व्हेरॉक अकादमीने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ४१९ धावा केल्या यावेळी प्रिन्स कलाटेने ३१ चौकार व एक षटकारासह १४९ चेंडूत १९४ धावांची तर प्रत्यूष उघाडेने १०२ चेंडूत २१ चौकारासह १३९ धावांची खेळी केली. प्रत्यूत्तर देताना वेदिक अकादमीचा डाव ११३ धावांत आटोपला. अर्णव भेंडभारने सतरा धावा देऊन पाच तर राजवीर वाळकेने तीन गडी बाद केले. ‘सामन्याचा मानकरी’ हा मान प्रिन्स कलाटेने मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः
व्हेरॉक क्रिकेट अकादमी - (५० षटकांत) ४ बाद ४१९ (प्रिन्स कलाटे १९४, प्रत्यूष उघाडे १३९, कनिष्क गोन ४६, अर्णव महाजन २-५३) विजयी विरुद्ध वेदिक क्रिकेट अकादमी - (३५.४ षटकांत) सर्वबाद ११३ (ईशान सिरजी ३४, आरंभ पाटील २७, अर्णव भेंडभार ५-१७, राजवीर वाळके ३-२२)
---------------
Media Ids : PNE26W60783,
PNE26W60784