NEET Paper Leak Pune: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील मुख्याध्यापिका मनीषा हवालदार निलंबित; सीबीआयची कारवाई

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची कारवाई; अनुभवी मुख्याध्यापिकेचे तत्काळ निलंबन, संस्थेने कठोर भूमिका घेत चौकशी समिती नेमली
Immediate Suspension: Principal Manisha Havaldar Removed After CBI Arrest

Immediate Suspension: Principal Manisha Havaldar Removed After CBI Arrest

Sakal

Updated on

पुणे : देश पातळीवर सध्या गाजत असलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाच्या ‘नीट’ पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून मनीषा हवालदार या शिक्षिकेला अटक केली आहे. फडके हौद परिसरातील सेठ हरिलाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका असणाऱ्या हवालदार यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com