Pune Crime : कैद्याने घातला येरवडा कारागृह प्रशासनाला २७ लाखांचा गंडा; मनी ऑर्डर पुस्तिकेत केला फेरफार

मनी ऑर्डर आलेली नसताने त्याने पैसे जमा आहेत, असे दाखवून ते पैसे कारागृहातील कॅन्टीनमध्ये खर्च केले
prisoner make fraud of 27 lakhs to yerawada jail administration money order book pune crime
prisoner make fraud of 27 lakhs to yerawada jail administration money order book pune crime Sakal

पुणे : येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहातील अधिकाऱ्यांची बनावट सहीद्वारे मनी ऑर्डर पुस्तिकेत फेरफार करून २६ लाख ६९ हजार ९११ हजार रुपयांचा अपहार केला आहे. मनी ऑर्डर आलेली नसताने त्याने पैसे जमा आहेत, असे दाखवून ते पैसे कारागृहातील कॅन्टीनमध्ये खर्च केले आहेत.

या प्रकरणी येरवडा पोलिसांनी कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सचिन रघुनाथ फुलसुंदर (सध्या रा. येरवडा कारागृह, मुळ रा. जुन्नर) असे कैद्याचे नाव आहे. याबाबत कारागृह अधिकारी बाबूराव मोटे (वय ३८) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फेब्रुवारी २०२१ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान हा प्रकार घडला.

फुलसुंदरवर बलात्कार तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी २००६ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. कारखाना विभागात तयार होणाऱ्या वस्तू बाहेर विक्रीस पाठविण्याचा बहाणा करून फुलसुंदरने कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विश्‍वास मिळवला.

prisoner make fraud of 27 lakhs to yerawada jail administration money order book pune crime
Pune Accident : फोनवर बोलताना दुचाकी आदळली दुभाजकावर; डोक्याला मार लागल्याने तरुणाचा मृत्यू

त्यानंतर त्याने मनी ऑर्डरच्या नोंदणी पुस्तिकेत कारागृह अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी, बनावट हिशेब, तसेच अन्य कैद्यांची बनावट सही करून फेरफार करण्यास सुरवात केली. याबाबत येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कैद्यांचे नातेवार्इक कैद्यांच्या खर्चासाठी मनी ऑर्डरद्वारे पैसे पाठवत असतात.

ते पैसे कैदी कॅन्टीनमध्ये काही वस्तू घेण्यासाठी वापरत असतात. कैद्यांची मनी ऑर्डर आल्यानंतर कारगृह प्रशासन ते पैसे स्विकारते व त्यांची पुस्तिकेत नोंदणी केली जाते. त्यानुसार प्रत्येक कैद्यांचे खाते तयार केले जाते. त्यांच्या खात्यावर जमा असलेले पैसे कैदी वापरू शकता. फुलसुंदर याने मनी ऑर्डर आलेले नसताना स्वतःच्या आणि इतर कैद्यांच्या नावे पैसे आले आहेत, अशी नोंद पुस्तिकेत केली.

prisoner make fraud of 27 lakhs to yerawada jail administration money order book pune crime
Pune News : माजी नगरसेवक अभिजित बाळासाहेब शिवरकर यांच्यावर गुन्हा दाखल

अशा प्रकारे त्याने एकूण २६ लाख ६९ हजार रुपयांच्या नोंदी केल्या आहेत. त्या नोंदीच्या आधारे फुलसुंदर आणि त्यांच्या साथीदारांनी कॅन्टीनमधून विविध वस्तू घेतल्या. खाद्यपदार्थ व कपडे अशा बाबींवर त्याने हे पैसे खर्च केले आहेत. हा प्रकार कारागृहातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.

मनी ऑर्डरच्या विभागासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती

फुलसुंदर याने केलेला प्रकार निदर्शनास आल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून त्वरित मनी ऑर्डरच्या विभागासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाराच्या माध्यमातून मनी ऑर्डरच्या विभागातील सर्व व्यवहारांवर नजर ठेवली जाणार आहे. तसेच हा सर्व व्यवहार आता डिजिटल पद्धतीने केला जाणार आहेत, अशी माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली.

चांगले काम करीत असलेले किंवा एखाद्या क्षेत्राची माहिती असलेल्या कैद्यांना विश्‍वासाने काही बाबी हाताळण्याची संधी दिली जाते. मात्र हा गैरप्रकार आल्यानंतर त्वरित कैद्यांवर कारवार्इ करण्यात आली आहे. असे प्रकार टाळण्यासाठी कॅन्टीनचे व्यवहार डिजिटल पद्धतीने होणार आहेत. तसेच मनी ऑर्डरच्या विभागासाठी जबाबदार अधिकारी नेमण्यात आला आहे. इ-प्रिझन प्रणालीनुसार सर्व कामकाज केले जाणार आहे.

- जालिंदर सुपेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह जेल विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com