पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था कधी होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

pruthviraj chavan
pruthviraj chavan

पुणे : देशाची अर्थव्यवस्था कधी ना कधी पाच ट्रिलियन होणार आहेच, मग भले योगी अदित्यनाथ अर्थमंत्री झाले तरी. पण पहिल्या तिमाहीमध्ये विकास दर हा पाच टक्‍क्‍यांवर आला आहे. यानुसार आपली अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन कधी होणार ते सांगा असे आव्हान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला दिले. 
पुण्यात काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. आमदार शरद रणपिसे, शहराध्यक्ष माही आमदार रमेश बागवे, मोहन जोशी आदी यावेळी उपस्थित होते. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गेल्या पाच वर्षातील पहिल्या तिमाहीममधील हा सर्वात कमी विकास दर आहे. या उतरलत्या आलेखावरून आर्थिक मंदी असल्याचे स्पष्ट होत आहे. सरकारने पाच ट्रिलीयनची घोषणा केली, पण प्रत्यक्षात आकडे मात्र विसंगत आहेत. यामुळे निर्मिती क्षेत्रातील रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. साडे तीन लाख जण बेरोजगार झाले. वाहनउद्योगातील 10 लाख नोकऱ्या गेल्या तर पुणे, मुंबईतील 100 शोरूम बंद पडल्या आहेत. नागपूर येथील मिहान प्रकल्पात जमीनी घेतलेल्या आठ उद्योगपतींनी जमीनी सरकारली परत केल्या. सरकारने यासाठी काय पाऊल उचलणार हे सांगावे. 

केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या 1 लाख 76 हजार कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे. यापुर्वी एवढी मोठी रक्कम कोणत्याही सरकारने घेतली नव्हती. हा व्यवहार म्हणजे मंगळसुत्र विकून घर चालविणे असा प्रकार आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. 
बेरोजगारी, आर्थिक मंदी हे सराकरचे अपयश आहे, पण बालाकोट, प्रज्ञा साध्वी सारखे विषय भाजप सरकार चालाखिने पुढे आणून हे गंभीर मुद्दे बाजूला करत आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com