मुख्यमंत्र्यांकडून वंचित आघाडीला बळ : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित आणि भाजपचे काय संबंध होते हे सर्वांना माहित आहे. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंचितला बळ येत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

पुणे : लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित आणि भाजपचे काय संबंध होते हे सर्वांना माहित आहे. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंचितला बळ येत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे विंचीत बहुजन आघाडी हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष होईल असा दावा केला. त्यावर चव्हाण म्हणाले, वंचित आघाडी वाढावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत. लोकसभेत त्यांचे काय संबंध होते हे लोकांना माहिती आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे जागा वाटपासाठी अजून चर्चा झालेली नाही. तसेच आणखी आघाडीत कोणाला घ्यायचे हे ठरलेले नाही. 

मुख्यमंत्री फडणवीस हे अमित शहांप्रमाणे सामा दाम दंड भेद वापरून विरोधी पक्षातील नेत्यांना धमकावून भाजपमध्ये घेत आहेत. विरोधी पक्ष संपवून टाकायचे, एकाच पक्षाशी लोकशाही आणायची हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचे षडयंत्र आहे. ही एका पक्षाची हुकूमशाही आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prithviraj Chavan said Chief Minister is Strengthening the deprived front