Prithviraj Chavan: 'टिप्पणी टाळली असती तर बरे झाले असते'; सुनेत्रा पवार वादावर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले, वादाशी माझा संबंध नाही..
Chavan Distances Himself From Sunetra Pawar Controversy: काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवरून निर्माण झालेल्या वादापासून पृथ्वीराज चव्हाणांनी स्वतःला दूर ठेवत, सुनेत्रा पवारांवरील टिप्पणी टाळायला हवी होती असे स्पष्ट मत नोंदवले.
पुणे: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून केलेली टिप्पणी टाळता आली असती तर बरे झाले असते. या वादाशी आपला कोणताही संबंध नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.