
पुणे : राज्याच्या मोटार वाहन विभागातील ३३१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची पदोन्नती होणार आहे. बदली प्रक्रियेत पारदर्शकता राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही असताना, परिवहन विभागातील काही बडे अधिकारी मात्र ‘ऑफलाइन’ पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया राबविण्याचा घाट घालण्याच्या तयारीत आहेत. बदल्यांसाठी ऑनलाइन धोरण ठरलेले असताना अचानक परिवहन आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून ‘ऑफलाइन’ पद्धतीने पदोन्नती दिली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.