ujani dam fishing
sakal
पुणे - उजनी धरणावरील खासगी मासेमारी ठेक्यासाठी सुरू करण्यात आलेली ई-निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. खासगी ठेकेदारीमुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या उजनी धरण परिसरातील मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता स्थानिक मच्छिमार व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली होती. या ठेका प्रक्रियेला विरोध करत पुण्यात सिंचन भवनासमोर आंदोलन केले होते.