पुण्यातील "जम्बो'च्या दिमतीला खासगी डॉक्‍टरांची फौज 

doctor
doctor

पुणे -  पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांच्या उपचारांवरील देखरेखीसाठी आता खासगी विशेषत: मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांनीही पुढाकार घेतला आहे. अत्यवस्थ रुग्णांवरील उपचारांत वाढ करून त्यांना बरे करण्यासाठी हे डॉक्‍टर प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी ससूनसह दीनानाथ मंगेशकर, रुबी, जहॉंगीर अशा हॉस्पिटलमधील तज्ज्ञ "जम्बो'च्या व्यवस्थापनाच्या मदतीसाठी आले आहेत. गरजेनुसार "व्हिडिओ कॉलिंग'द्वारेही उपचाराचे सल्ले दिले जाणार आहेत. 

"सीओईपी'च्या आवारातील जम्बो कोविड केअर सेंटरमधील सुविधांचा विस्तार केल्याने रुग्ण संख्या वाढली आहे. येथील बेड आणि उपचार व्यवस्थेत सुधारणा झाल्यानंतर नव्या अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यावरील नेमक्‍या उपचारानंतर ते कोरोनामुक्त होत असल्याचे दिसून आले आहे; परंतु पुरेसे तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध होत नसल्याने खासगी हॉस्पिटलमधील डॉक्‍टर उपचारासाठी पुढे आले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"जम्बो'चे समन्वयक राजेंद्र मुठे म्हणाले, "सध्या रोज नव्या 50 ते 55 रुग्णांना दाखल करून घेतले जात आहेत. त्यातील बहुतांशी रुग्ण हे 50 वर्षांपेक्षा अधिक वयाचे असतात. त्यांच्यावरील उपचारासाठी रोज नवनव्या हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांना बोलाविण्यात येत आहेत. त्यांच्याकडून येथील डॉक्‍टरांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे.' 

शनिवारपासून क्षमता वाढणार 
सध्या "जम्बो'त चारशे बेड उपलब्ध आहेत. त्यात आणखी चारशे बेड वाढविण्याच्या कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) नव्या एजन्सीला देण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारपासून (ता. 19) टप्प्याटप्प्याने रुग्णही वाढविण्यात येणार आहेत. नव्या बदलांनंतर पूर्णपणे आठशे बेड उपलब्ध होणार आहेत, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. 

देशभरातील  बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जम्बोतील स्थिती 
एकूण रुग्ण  - 235 
ऑक्‍सिजन बेडवरील रुग्ण  - 195 
आयसीयूतील रुग्ण  - 40 
आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले रुग्ण  -350 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com