महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची खासगी प्रॅक्टीस

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची खासगी प्रॅक्टीस

येरवडा - पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी इतर रुग्णालयांमध्ये दुसऱ्यांच्या नावाने खासगी प्रॅक्टीस करीत असल्याचे उघड झाले आहे. तर त्यांनी इतर रुग्णांलयांमध्ये काम करू नये महापालिका डॉक्टरांना पगाराच्या तब्बल ३५ टक्के ‘नॉन प्रॅक्टीसींग अलॉंऊस’ देत. त्यामुळे अशा डॉक्टरांवर आयुक्तांच्या आदेशाने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात १५६ वैद्यकीय आहेत. महापालिका डॉक्टरांना लाखाच्या वर पगार देते. तर त्यांनी खासगी रुग्णालयात काम करू नये त्यांनी शहरातील गरीब व गरजू रुग्णांना चांगली सेवा द्यावी यासाठी महापालिका त्यांना पगाराच्या तब्बल ३५ टक्के ‘नॉन प्रॅक्टीसींग अलॉंऊस’ देते. तरी सुद्धा अनेक डॉक्टर नियमबाह्यपणे पुणे शहर व पिंपरी-चिंचवड मधील खासगी मोठ्या रुग्णालयात वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. यातील अनेक डॉक्टरांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवण्यास मात्र महापालिकेला पूर्णत: अपयश आले आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागातील अनेक डॉक्टर खासगी रुग्णालयात किंवा स्वत:च्या रुग्णालयात वैद्यकीय व्यवसाय करीत असल्यामुळे ते नोकरीला असलेल्या ठिकाणी अर्थात कमला नेहरू रुग्णालय किंवा येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात वेळेवर पोचले नसल्यामुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. तर राजीव गांधी रुग्णालयातील गरोदर माता शुभांगी जानकर यांचा बाळासह मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेले व सध्या निलंबीत असलेले डॉ. विजय बडे दीघी येथील त्यांच्या रुग्णालयात वैद्यकीय व्यवसाय करायचे. त्यांना वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तंबी दिली होती.

महापालिकेच्या रुग्णांलयांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी आहे. अशा वेळी काही वैद्यकीय अधिकारी नॉन प्रॅक्टीसींग अलाॅऊस घेऊन खासगी रुग्णालयात वैद्यकीय व्यवसाय करीत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.’’
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महानगरपालिका

खासगी रुग्णालयात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर महापालिकेत नोकरी करणारे व नॉन प्रॅक्सीसिंग अलॉऊस घेणारे वैद्यकीय अधिकारी स्वत:च्या व दुसऱ्यांच्या नावाने भोसरी, दिघी, हडपसर, वारजे, पिंपळे-गुरव आदी ठिकाणी असलेल्या रुग्णालयांत वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. तर तब्बल डझनभर डॉक्टर सतत गैरहजर असतात मात्र अद्याप त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com