

पुणे - शहरातील महत्त्वाच्या व सर्वात मोठ्या वैकुंठ स्मशानभूमीसह बिबवेवाडी स्मशानभूमीचे खासगीकरण करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. या दोन्ही स्मशानभूमीतील विद्युत यंत्रणेचे संचालन, देखभाल आणि दुरुस्तीचे काम खासगी संस्थेकडे सोपविण्यात येणार आहे. त्यासाठी वस्तू व सेवा करासह तब्बल ९९ लाख ५१ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.