esakal | कात्रज प्राणीसंग्रहालयातील प्रियदर्शनी वाघिणीचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

कात्रज प्राणीसंग्रहालयातील प्रियदर्शनी वाघिणीचे निधन

प्राणीसंग्रहालयातील प्रियदर्शनी वाघिणीचे निधन

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

कात्रज : कात्रजमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील पांढऱ्या पट्टेरी प्रियदर्शनी वाघिणीचे आज (ता. ०१) वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी तिचे वय २१ वर्षे होते. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ती आजारी होती. तसेच तिचे खाणे पिणे देखील कमी झाल्याची माहिती प्राणीसंग्रहालय प्रशासनाने दिली.

शवविच्छेदन केल्यानंतर प्राणी संग्रहालयाचे संचालक राजकुमार जाधव आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील चार ते पाच वर्षापासून प्रियदर्शनीला वार्धक्यामुळे व्यवस्थित चालता येत नसल्याने तिला पर्यटकांना दाखविण्यात येत नव्हते. तसेच तिच्या अंगाला जखमांही झाल्या होत्या.

हेही वाचा: राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकते; आशिष शेलारांचे सूचक वक्तव्य ! ; पाहा व्हिडिओ

दरम्यान, राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता एकूण ४ वाघ आणि ३ वाघिणी आहेत. त्यापैकी प्राणीसंग्रहालयात नुकतीच अर्जुन आणि भक्तीची जोडी औरंगाबादहून दाखल झाली आहे. त्याचबरोबर रिद्धी, गुरु, आकाश आणि तानाजी असे सहाजण पिवेळे पट्टेरी वाघ आहेत. तर, राजकोटवरून आणलेल्या पांढऱ्या पट्टेरी वाघिणीचे नाव अजून ठेवण्यात आलेले नाही.

"वाघांचे सर्वसाधरण वय १६ ते १८ वर्ष असते. आम्हाला आणखी एक ते दोन महिने प्रियदर्शनी जगेल अशी आशा होती. परंतु, आज तिने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे प्राणीसंग्रहालयातील वाघांची संख्या आता आठवरून सात झाली आहे."

- राजकुमार जाधव, संचालक राजीव गांधी प्राणी संग्रहालय.

loading image
go to top