पाककृती स्पर्धेत प्रियांका पेणकर प्रथम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पुणे -  ‘सकाळ’ व त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सवतर्फे महिलांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कसबा पेठेतील श्री महाकालिकामाता मंदिरात झालेल्या या स्पर्धेत प्रियांका पेणकर (उकडीचे मोदक) प्रथम क्रमांक यांनी मिळवला.

नवरात्रोत्सवानिमित्ताने घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये तरुणींपासून ज्येष्ठ महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मंडळाच्या कार्यक्रम समितीच्या उपाध्यक्ष गिरिजा पोटफोडे म्हणाल्या, ‘‘अशा प्रकारचे कार्यक्रम हे महिलांचा उत्साह वाढवणारे असतात. या वेळी घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमामुळे मन आनंदी झाले.’’

या स्पर्धेत द्वितीय क्रमांक नयना दांडेकर(चकली) व तृतीय क्रमांक स्वाती कोटकर (उपवासाचे मेंदू वडे) यांनी पटकवला. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक सोनाली आर्ते, सुनीता सातव व श्रद्धा निजामपूरकर यांनी मिळाले. स्पर्धेचे परीक्षण पाककला तज्ज्ञ सुजाता नेरूरकर यांनी केले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष सतीश करडे, कार्यावाहक दिलीप खुळे उपस्थित होते. गिरिजा पोटफोडे, अंजलेश वडके, मिलिंद पोटफोडे, अश्‍विनी वडके यांनी संयोजन केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Penkar First in the Pak Recipe