राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये न्हावी येथील प्रियांशुला सुवर्ण

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये न्हावी येथील प्रियांशुला सुवर्ण
Published on

नसरापूर, ता.१२ : नाशिक येथे कराटे-डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कॅडेट व ज्युनिअर कराटे अजिंक्यपद स्पर्धेत प्रियांशु वैभव जगताप हिने सुवर्णपदक पटकविले. तिने कुमेथी प्रकारात वय वर्षे ९ मधील ३५ किलोच्या आतील वजनगटात राज्यस्तरावर यश संपादन केले आहे.
न्हावी (ता.भोर) येथील जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप व माजी जिल्हा परिषद सदस्य, राजगड कारखाना संचालक शिवाजीराव कोंडे यांची प्रियांशु ही नात तर इफोटेल बाय सयाजी हॉटेल ग्रुपचे वैभव जगताप व स्नेहल जगताप यांची कन्या आहे. पुणे येथील एस.पी.एम स्कूलमध्ये चौथीत शिकत आहे. प्रियांशुने आत्तापर्यंत अनेक स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली.
दरम्यान, राज्यस्तरीय स्पर्धेतील या कामगिरीमुळे जूनमध्ये डेहराडून येथे होणाऱ्या नॅशनल कराटे चॅम्पियनशिपसाठी प्रियांशुची निवड झाली आहे. तेथे ती महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या यशात चॅम्पियन्स कराटे क्लबचे प्रशिक्षक वेदांत तडवळकर, सुजित वेताळ आणि वेदांत ताम्हणकर तसेच आई ॲड. स्नेहल जगताप आणि वडील वैभव जगताप यांचा मोठा वाटा आहे.

06369

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com