ओटीपी उशीरा आल्याने गोंधळ; अंतिम वर्षाच्या ऑफलाइन परीक्षेत पहिल्याच दिवशी अडथळे

ब्रिजमोहन पाटील
Monday, 12 October 2020

- पहिल्याच दिवशी गोंधळ
- दुपारच्या सत्रातील पेपरचे वेळापत्रक खोळंबणार 
- ऑनलाईन परीक्षा सुरळीत सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आज पासून अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास सुरुवात केली. मात्र, पहिल्याच दिवशी ऑफलाइन परीक्षेचा खोळंबा झाला. विद्यापीठाकडून ऑनलाइन पाठविल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिकांची प्रिंट करण्यासाठी आवश्यक असणारा 'ओटीपी' न आल्याने पहिल्या सत्रातील परीक्षा ठप्प झाली आहे. सकाळी १०चा पेपर दुपारी १२ला सुरू झाला. त्याचा परिणाम इतर दिवसभराच्या वेळापत्रकावर होणार आहे. तर विद्यापीठाकडे मोठे आव्हान असलेली ऑनलाइन परीक्षा सुरळीत सुरू झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची ऑफलाइन परीक्षा घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात 34 नगर जिल्ह्यात 34 आणि नाशिक जिल्ह्यात 45 अशा एकूण 113 महाविद्यालयांमध्ये व्यवस्था केली आहे. जवळपास पन्नास हजार विद्यार्थी ऑफलाइन परीक्षा देणार आहेत. सोमवारी सकाळी दहा वाजता ऑफलाइन परीक्षेचे पहिले सत्र सुरू होणार होते, त्यासाठी संबंधित परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यात आले. पंधरा-वीस मिनिट होऊन गेले तरी प्रश्नपत्रिकांचे व ओएमआर उत्तरपत्रिकांचे वाटप झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना पेपर कधी मिळणार याची चौकशी सुरू झाली. त्यावेळी विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिका आली नाही. त्यामुळे थोडासा वेळ लागत आहे असे सांगण्यात आले. मात्र, साडे अकराच्या सुमारास ओटीपी आल्यानंतर प्रश्नपत्रिकांची प्रिंट काढून बाराच्या सुमारास पहिल्या सत्रातील पेपर सुरू झाला प्रत्येक सेंटरवर एका सत्रामध्ये साधारणपणे दोनशे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी  सांगितले की, प्रश्नपत्रिकांची प्रिंट काढण्यासाठी विद्यापीठाकडून ओटीपी येणे गरजेचे आहे. पण तो अआलेला नसल्याने पहिल्या सत्राची परीक्षा अजून सुरू झालेली नाही. विद्यापीठाकडे चौकशी केली असता थोडा वेळ थांबा असे सांगितले गेले. शेवटी आत्ताच साडे अकराला ओटीपी आल्यावर पेपरला सुरुवात झाली आहे. पण याचा परिणाम दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांवरील होणार असून आम्हालाही विद्यार्थ्यांना त्या उत्तर द्यावे हे कळत नाही. दरम्यान पहिल्या सत्रातील १० वाजताची ऑनलाईन परीक्षा व्यवस्थित सुरू झाली आहे.
 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Problems of first day of final year offline exams due to otp receiving late