कोरोनाने विमान प्रवासाचे असेही बदलले चित्र...

कोरोनाने विमान प्रवासाचे असेही बदलले चित्र...

पुणे : विमानतळ म्हटले की, एरवी दिसणारी गर्दी, सिक्युरिटी चेक इनसाठी मोठ्या रांगा, गडबड- गोंगाट, हे दृश्य आता बदलत आहे. प्रत्येक प्रवाशाच्या चेहऱ्यावर मास्क, फेसशिल्ड, दोन व्यक्तींमध्ये किमान तीन-चार फुटांचे अंतर आता विमानतळावर दिसू लागले आहे. या बदलाला निमित्त ठरले ते कोरोनाचे.

लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकराने परवानगी दिल्यावर 25 मे पासून देशार्तंगत विमान वाहतूक सेवा सुरू झाली आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अटी घातल्या आहेत. विमानतळ प्रशासन, पोलिस यांच्याकडून त्यांची काटेकोर अंमलबजावणी सुरू असल्याचे प्रडसाद सोशल मीडियावरही उमटत आहेत. अनेक प्रवाशांनी या बाबतच्या पोस्ट शेअर केल्या असून त्यात विमानतळ प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विमानतळाच्या आवारात प्रवेश करताना तिकिटाची प्रिंट आऊट आणि ओळख पटविणारे आधार किंवा पॅनकार्ड बंधनकारक आहेच. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांकडे विमानतळ प्रशासन विशेष लक्ष देत आहे. तसेच वैद्यकीय तपासणी दरम्यान कोरोनाची लक्षणे आढळणारा रुग्ण दिसल्यास त्याला प्रवास करून दिला जात नाही. तसेच तेथील वैद्यकीय पथकाकडून तपासणी केली जाते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विमानतळातून बाहेर पडताना प्रत्येक प्रवाशाच्या हातावर 14 दिवस होम क्वारंटाईनचा शिक्काही मारला जात आहे. या सर्व प्रक्रियेवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. प्रत्येक ठिकाणी सुरक्षित अंतरावर रांगा लावण्यावर त्यांचा कटाक्ष आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत रांगा मोठ्या दिसत असल्या तरी वेळ तेवढाच लागत असल्याचा अनुभव प्रवाशांनी सकाळशी बोलताना व्यक्त केला.

विमानतळावर असा झाला आहे बदल

- प्रत्येक प्रवेशाला मास्क बंधनकारक
- प्रवासाच्या आधी दोन ते तीन तास पोचणे बंधनकारक
- प्रवेशद्वाराच प्रवाशाच्या शारिरीक तापमानाची तपासणी
- मोबाईलमधील सेतू ऍपमध्ये ग्रीन लाईट लागल्यावरच प्रवेश
- वेब चेक इनचा बोर्डिंग पास घेणाऱया किऑसवर सॅनिटायझर
- सिक्युरिटी चेक इनसाठी रांगामध्ये मार्किंगवरच उभे राहण्याची सक्ती

- विमानतळावर बसण्यासाठी खुर्च्यांमध्ये एक आड एक बसणे बंधनकारक
- विमानतळातून बाहेर पडताना पुन्हा तापमान तपासणी आणि सेतू ऍपची पाहणी

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विमानात असा झाला आहे बदल

- विमानात खाद्यपदार्थ खाण्यास बंदी
- विमान कंपन्यांकडून फक्त मिळणार पिण्याचे पाणी
- प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायझर, मास्क आणि फेसशिल्डचा पॅक
- हॅन्डबॅगशिवाय 20 किलो वजनाखालील बॅग लगेजमध्ये
- विमानातून चढ-उतार करताना सोशल डिन्स्टिसिंग बंधनकारक, त्यामुळे मोठी रांग

पार्किंगमध्येही बदल

- लॉकडाऊनमुळे कॅब किंवा सार्वजनिक वाहतूक बंद आहे. पुण्यात 9859198591 या क्रमांकावर विमानतळावर जाण्यासाठी किंवा तेथून येण्यासाठी रिक्षा सेवा उपलब्ध आहे. त्यावर गुगल फॉर्म भरला की, प्रवाशाच्या वेळेनुसार रिक्षा येते. तिचा क्रमांक प्रवाशाला अगोदर कळविला जातो. त्यामुळे ठराविक ठिकाणी त्याला रिक्षा मिळू शकते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- प्रवाशांच्या खासगी वाहनांना परवानगी असली तरी, त्यांच्यासाठी वेगळी रांग विमानतळाच्या आवारात आहे. त्यामुळे तेथेही गर्दी होत नाही. उतरणे किंवा बसणे, हे मात्र काही क्षणांत पूर्ण करण्यावर पोलिसांचा कटाक्ष आहे.

लोहगाव विमानतळावरून चंदीगडला रवाना झालेले सॉफ्टवेअर डेव्हलपर सतेज शर्मा म्हणाले, आता विमानतळावर जरा वेगळेच वाटत आहे. सगळ्यांच्याच चेहऱ्यांवर मास्क आणि ग्लोव्हज दिसतात. त्यामुळे परस्परांशी बोलण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी विमानतळावरील गोंगाट कमी झाला आहे. प्रवाशांच्या सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्याचा हा प्रकार अत्यंत चांगला आहे. विमानतळावरील कॅफेटेरीयामध्येही सुरक्षितता घेतली जात आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातून दिल्लीला रवाना झालेले आयटी प्रोफेशनला शिवकरण म्हणाले, विमानतळाच्या आवारात सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते. मात्र, विमानात प्रवाशांनी काळजी घ्यायला पाहिजे. विमान कर्मचारी किती लक्ष देणार. प्रवासाची आधी भीती वाटत होती. मात्र, प्रवास केल्यावर सुरक्षिततेच्या उपाययोजनांची पुरेपूर काळजी घेतली जात आहे, असे दिसते. त्यामुळे 90 टक्के सुरक्षितता वाटते. त्याबद्दल पोलिस, विमानतळ कर्मचारी, विमान कंपन्यांचे कर्मचारी या सगळ्यांचे आभार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com