
गुंठेवारीतील बांधकाम अधिकृत करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू
पुणे - गुंठेवारीमध्ये पद्धतीने (Gunthewari Process) करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम (Illegal Construction) अधिकृत करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे (Pune Municipal) सोमवारी (Monday) (ता. १०) पासून प्रक्रिया सुरू होणार आहे. नागरिकांना यासाठी आर्किटेक्ट किंवा इंजिनिअर्सच्या माध्यमातून यासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. यासाठी ३१ मार्च २०२२ ही अंतिम तारीख असणार आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियामाच्या आधारे ३१ डिसेंबर २०२० पूर्वी झालेली बांधकामे, मोकळे भूखंड नियमीत करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात गुंठेवारीमध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. त्यावर कारवाईसुद्धा केली जात होती, पण शासनाचा आदेश आल्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली. दरम्यान, राज्यात इतर शहरात हे बांधकाम अधिकृत करण्याची कार्यवाही यापूर्वीच सुरू झाली असली तरी पुण्यात याचा प्रारंभ झाला नव्हता. त्याचा गैरफायदा एजंट घेऊन पैसे उकळण्याचे प्रकार सुरू झाले होते. त्यामुळे ही प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी नागरिक तसेच महापालिकेच्या मुख्यसभेत केली जात होती. गेल्या आठवड्यात याची बैठक झाल्यानंतर आता गुंठेवारी नियमितीकरणाची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे.
हेही वाचा: कागदी पुठ्ठ्यापासून कुणालने बनवल्या तब्बल ५० गाड्या
या ठिकाणी करा अर्ज
www.punecorporation.org->building department-> या लिंकवर जाऊन अर्ज भरावा.
अर्ज करताना हे आवश्यकच
- सहा महिन्याच्या आतील सातबारा उतारा
- सातबारा नसल्यास इंडेक्स टू, खरेदीखत, कारारनामा साठेखत असेल तर विहित नमुन्यातील हमीपत्र
- वरील कागदपत्र नसल्यास मुखत्यारपत्र, मिळकतकर भरल्याची पावती, वीजबिल, रेशन कार्ड इत्यादी
- ३१-१२-२०२० पूर्वी बांधकाम केल्याचे कर संकलन विभागाचा दाखला, वीज बिल
- मान्यताप्राप्त इंजिनिअरकडून स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल
-३१-१२-२०२०पूर्वीचे व अर्ज करतानाचे गुगल मॅपचे लोकेशन देणे बंधनकारक
Web Title: Process Of Authorizing Construction Of Gunthewari Will Start From Monday
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..