esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Shivajirao Bhosale Cooperative Bank

ठेवी परत मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेमधील ठेवीदारांच्या केवायसी अर्जांची छाननी ठेव विमा महामंडळाकडून (डीआयसीजीसी) पूर्ण झाली आहे. तसेच, बॅंकेच्या प्रशासकांकडून महामंडळाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. त्यामुळे ठेवी परत करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, विमा महामंडळाकडून बॅंकेच्या खात्यात ऑक्टोबरअखेर पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

बॅंकेतील संचालकांच्या कथित गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर निर्बंध लादले होते. त्यामुळे ठेवीदारांना खात्यातून एक हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळत नव्हती. त्यामुळे ठेवीदारांना अद्याप संकटाला सामोरे जावे लागत आहे.

केंद्र सरकारच्या ठेव विमा कायद्यातील सुधारणेनंतर शिवाजीराव भोसले बॅंकेमधील ७० हजार ठेवीदारांना त्यांच्या पाच लाखांपर्यंतच्या ठेवी मिळतील. ठेवीदारांच्या खात्यामध्ये ३१ मे २०२१ अखेर शिल्लक रक्कम परत करण्यात येणार आहे. ही रक्कम व्याजासह जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत असेल. ठेवीदारांच्या इतर बॅंकेच्या खात्यात ही रक्कम ऑनलाइन जमा करण्यात येणार आहे. ठेवीदारांना दिवाळीपूर्वी ठेवी परत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती बॅंकेचे अवसायक डॉ. आर. एस. धोंडकर यांनी दिली.

बॅंकेची सद्यःस्थिती

  • शाखा १४

  • एकूण ठेवी ४३२ कोटी रुपये

  • ठेवीदार संख्या ७१ हजार ७७०

  • एक लाख रुपयांच्या आतील ठेवीदार : ६३ हजार ६५८

  • एक ते पाच लाख रुपयांपर्यंत ठेवीदार : ६ हजार ३००- पाच लाख रुपयांवरील ठेवीदार : १ हजार ८१२

loading image
go to top