प्रा.गणेश धायगुडे यांना पी.एचडी

प्रा.गणेश धायगुडे यांना पी.एचडी

Published on

MLG26B03197
प्रा.गणेश धायगुडे
...........
प्रा.गणेश धायगुडे यांना पीएच. डी
माळीनगर : तालुक्यातील गट नंबर दोन येथील प्रा. गणेश गोरख धायगुडे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएच.डी मिळाली आहे. श्री.धायगुडे यांचे प्राथमिक शिक्षण गट नं. २ येथे, शालेय शिक्षण दि. मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर व महाविद्यालयीन शिक्षण शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे झाले. सध्या ते याच महाविद्यालयात वाणिज्य विभागात तासिका तत्त्वावर सहप्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कृषी विकासात प्राथमिक कृषी पतसंस्थांची भूमिका या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला. त्यांना डॉ. बी. एस साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील, सचिव अभिजित खराडे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, कॉलेजचे सभापती सयाजीराजे मोहिते- पाटील, प्राचार्य डॉ. एस. के. टिळेकर यांनी त्यांचा सन्मान केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com