esakal | सॉरी गुड्डी ! फेसबूक पोस्ट करत पुण्यातील कमीन्स कॉलेजच्या प्रोफेसरची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

सॉरी गुड्डी ! फेसबूक पोस्ट करत पुण्यातील  प्रोफेसरची आत्महत्या

सॉरी गुड्डी ! फेसबूक पोस्ट करत पुण्यातील प्रोफेसरची आत्महत्या

sakal_logo
By
सागर आव्हाड

पुणे : पुण्यातील कमीन्स कॉलेजच्या एका प्रोफेसरने फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगळवारी (ता. १३) दुपारी सासवड येथील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव प्रफुल्ल दादाजी मेश्राम (वय ४५, रा. कात्रज) असे असून नैराश्येतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

हेही वाचा: रंग वारीचे:`थ्री - डी' रांगोळीतून पांडुरंगाचे दर्शन

सासवड पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. प्रफुल्ल मेश्राम हे कमिन्स कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. मंगळवारी (ता.१३) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी फेसबुकवर "बाय बाय डिप्रेशन," "सॉरी गुड्डी" अशी शेअर केली. त्यानंतर भिवरी (ता. पुरंदर) गावात रस्त्याच्याकडेला असणाऱ्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.

दरम्यान, सोशल मिडियावरील पोस्ट पाहून त्यांच्या मित्र-नातेवाईंकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांनीही त्यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, सासवड पोलिसांना तपासा दरम्यान, एका विहिरीजवळ चप्पल, गाडीची चावी, पॉकेट, मोबाईल, हेडफोन, रुमाल हे समान आढळले. त्यानंतर विहिरीत त्यांना मेश्राम यांचा मृतदेह आढळून आला.

loading image